शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा; अजित बोरकर स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा… स्वाभिमानीचे हलगीनाद आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन
संचार वृत्त
शासन राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असताना अवघ्या जगाचा पोशिंदा ,अन्नदाता शेतकरी मात्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचितच आहे यामुळे सातत्याने ओल्या व सुक्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांचे अश्रू सरकार कधी पुसणार ? वर्षानुवर्ष दारिद्र्यात राहणाऱ्या बळीराजाला न्याय कधी मिळणार ? या पार्श्वभूमीवर सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जाग आणण्यासाठी हलगी नाद आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या विविध मागण्यांचे निवेदन माळशिरस तहसीलदारांना दिले .
यावेळी मगन काळे,भिमराव फुले,शिवाजी चव्हाण,दत्ता भोसले, आप्पा चव्हाण,डॉ.सचिन शेंडगे,अजित बोरकर,उमेश भाकरे, गोपाळ घाडगे,अमरसिंह माने-देशमुख तात्यासाहेब काळे, उद्धव निंबाळकर,जब्बार आतार,मुकुंद काळे,दादासाहेब काळे,राजेश खरात, विकास काळे,आपा शिंदे, लक्ष्मण राचकर,भानुदास खरात,सचिन बोरकर सचिन मदने, शहाजी काळे,रसूल सय्यद,अभिजीत पाटील, श्रीमंत सावळकर, विजय वाघबंरे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
बळीराजाच्या न्याय हक्कासाठी माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हलगी नाद आंदोलन करून माळशिरसची तहसीलदार सुरेश शेजुळ यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिले यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या मागणीस माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले का आता करावी बळीराजाच्या दुधाला योग्य दर मिळावा खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य ती दर्जेदार खते उपलब्ध करून द्यावीत याचबरोबर माळशिरसच्या तहसील कार्यालयातून उत्पन्नाच्या दाखल्यासह विविध प्रकारचे दाखले रेशन कार्ड या संदर्भातील अडीअडचणी तात्काळ सुटाव्यात अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले यावेळी हे निवेदन माळशिरसचे निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांनी स्वीकारले
————————————————
मागील वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला होता यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे शासनाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचा
गांभीर्याने विचार करावा बळीराजावर असलेले कर्ज सरसकट माफ करावे इतर घटकांना ज्याप्रमाणे शासन न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच पद्धतीने अन्नदात्या व जगाच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज सरसकट माफ करावे अन्यथा स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार
अजित बोरकर, माळशिरस तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
————————————————
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले असून त्यांनी केलेल्या विविध मागण्यांचे निवेदन आम्ही वरिष्ठांकडे पाठविणार आहे
सुरेश शेजुळ ,तहसीलदार माळशिरस.