solapur
रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात घटस्थापनेच्या नंतर जाहीर प्रवेश करण्याची शक्यता
- *आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची केवळ औपचारिकता राहिलीच आहे*
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी मध्ये घटस्थापनेच्या नंतर जाहीर प्रवेश करण्याची शक्यता*
*श्रीपूर*
- भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे येत्या काही दिवसांतच म्हणजे घटस्थापना नंतर जाहीर पणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी मध्ये प्रवेश करण्याची केवळ औपचारिकता राहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी मध्ये प्रवेश झाल्यानंतर माढा विधानसभा निवडणुकीत ते त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना यावेळी माढा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील व रणजित शिंदे या दोघातच खरी लढत होणार आहे गेल्या वेळी मोहिते पाटील यांनी आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांना समवेत घेऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे पाच वर्ष भाजप बरोबर मोहिते पाटील यांनी चांगले जमवून व जुळवून घेतले भाजपमध्ये आल्या बद्दल रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधानपरिषदेत आमदार केले आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बर्या पैकी जमत होते सदाशिवनगर येथील मोहिते पाटील यांचे साखर कारखान्याला शासनाने हमीपत्र देऊन मोठे पॅकेज दिले आहे कारखाना सुरळीत सुरू आहे मात्र लोकसभा निवडणूक दरम्यान एकटे रणजितसिंह मोहिते पाटील सोडून संपूर्ण मोहिते पाटील परिवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी भाजपला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी मध्ये प्रवेश केला व माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली व मोठ्या मताधिक्याने निवडून आले एकीकडे भाजपला विरोध केला म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सह भाजप ची सर्व वरिष्ठ टीम मोहिते पाटील यांचे वर नाराज झाली आहे तर दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजप उमेदवारी देणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे ते लवकरच भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील व माढा विधानसभा निवडणुकीत या पक्षाकडून तिकीट देण्याच्या अटीवर ते भाजप मधून बाहेर पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडणार आहे एकटे रणजितसिंह मोहिते पाटील माळशिरस तालुक्यात भाजपला काही मदत करू शकणार नाहीत हे भाजपलाही पक्कं माहीत झाले आहे त्यामुळे त्यांना भाजप न सोडण्यासाठी भाजपचे नेतृत्व कसलीही मनधरणी करणार नाहीत हे निश्चित