माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या तुतारीमुळे भाजपचे कमळ पडले अडगळीत
माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी च्या तुतारी मुळे भाजपचे कमळ पडले अडगळीत
श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर येऊन ठेपली आहे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी यांच्या तुतारी ची जोरदार हवा सुटली आहे तुतारी हाती घेण्यासाठी अनेक मातब्बर नेते कार्यकर्ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे सर्वात जास्त चर्चा व मागणी माढा विधानसभा मतदारसंघात तुतारी हाती घेण्याची स्पर्धा वाढली आहे अकलूजचे मोहिते पाटील घराणे व माढा विधानसभा विद्यमान आमदार बबनदादा शिंदे या दोन अट्टल प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांनी तुतारी आपल्यालाच मिळेल असा प्रबळ दावा केला आहे शरद पवार हे या बाबतीत अत्यंत मुत्सद्दी व चाणाक्ष आहेत ते शेवटच्या क्षणी काय कोणाच्या पदरात उमेदवारीचे दान टाकतील व कोणाला कात्रज चा घाट दाखवतील हे त्यांनाच माहीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी घेतली व धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभूत करून निवडून आले त्यामुळे मोहिते पाटील यांचे या मतदारसंघात पारडं जड आहे असे त्यांच्या समर्थकांनी वातावरण निर्माण केले आहे तर आमदार बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्याच्या पाचवीला पुजलेला पाण्याचा दुष्काळ हटवला आहे सहकार क्षेत्रात कारखानदारी आणून माढा तालुक्यात शेतकरी सर्वसामान्य माणूस व्यापार उद्योग यांना चांगले दिवस आणले अशी धारणा शिंदे समर्थांची आहे आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यावेळी माढा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे तर आमदार बबनराव शिंदे यांचा पुतण्याने त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे तो ही यावेळी माढा विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी यांचें कडे गेल्या दोन महिन्यांपासून संपर्क वाढवला आहे त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांना डोकेदुखी वाढली आहे मोहिते पाटील यांचे घरातील रणजितसिंह मोहिते पाटील की शिवतेजसिंह मोहिते पाटील निवडणूक रिंगणात उतरणार याचा निर्णायक पत्ता मोहिते पाटील यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे कोणत्याही क्षणी भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या मनःस्थितीत आहेत तेच हातात तुतारी घेऊन माढा विधानसभा निवडणुक लढतील हे नक्की अशी खात्रीलायक वृत्त मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय यांचेकडून ऐकायला मिळत आहे या वेळी माढा विधानसभा निवडणुकीत अनेक लहान मोठे नेते कार्यकर्ते आमदार होण्याचे स्वप्न बाळगून आहेत या वेळी पंचरंगी लढत होऊ शकते त्यात अपक्ष किती असतील याची मोजदाद केली नाही या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे तुतारी चा प्रचार आपोआप निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वी होत असल्याने महायुतीचे कमळ मात्र तुतारी चे स्पर्धेत अडगळीत पडल्याचे सध्या तरी दिसून येत आहे महायुतीकडून माढा विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार मिळू शकते तसेच कोण प्रबळ दावेदार आहेत याची अद्याप कोणतीही चर्चा नाही