कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची 56 वी पुण्यतिथी साजरी
कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची ५६ वी पुण्यतिथी साजरी.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्याचे पहिले पंचायत समितीचे सभापती, गोरगरिबांचे कैवारी कर्मवीर बाबासाहेब तथा मारुतराव आनंदराव माने पाटील यांची आज ५६ वी पुण्यतिथी येथील विजय चौकामधील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पुष्पहार घालून व अभिवादन करून साजरी करण्यात आली.
अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे उपमुख्य अधिकारी जयसिंग खुळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.कै बाबासाहेब माने पाटील यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड,स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुंभार,जेष्ठ नागरिक संघटनेचे सतेज दिवटे गुरुजी,ननावरे सचिव,उत्कर्ष शेटे, सत्यजित गायकवाड,अनिल अन्नदाते,नेताजी माने,सूर्यकांत कुरुडकर,दादा राऊत,महादेव दळवी,सुधाकर कुंभार,महादेव पाटील,महाबळेश्वर कुंभार माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण फुले स.म.शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक हणमंत शिंदे, अशोक जावळे,गायकवाड साहेब,संदीप गांधी लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र आर्वे, विजय टोंगळे,उमेश शेटे,अरुण राऊत,देवचंद ओसवाल उपस्थितीत होते.यावेळी सहकार महर्षीं शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यासही पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते महादेव दळवी यांनी बाबासाहेब माने पाटील यांच्या जीवनावरील आठवणींना उजाळा दिला.