solapur

अखेर अभिजीत पाटील बद्दल केलेले भाकीत खरे ठरले

साप्ताहिक गस्तपथक चे भाकीत खरे ठरले

बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार-श्रीपूर

माढा विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील कोणाचे राजकीय गणितं बिघडवणार हे वृत्त गेल्या महिन्यात दिले होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून तुतारी हातात घेऊन निवडणूक लढण्याची शक्यता असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केले होते ते वृत्त अखेर खरं ठरलं आहे माढयात विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांनी पध्दतशीरपणे गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा वाड्या वस्त्या खेड्यात त्यांचे कार्यकर्ते सर्व्हे करत होते काही भागात बैलगाडा शर्यत पैठणीचा खेळ सांस्कृतिक कार्यक्रम यातून ते संवाद संपर्क वाढवत होते माढा विधानसभा निवडणुकीत या वेळी बदल घडवून आणण्यासाठी अभिजित पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना ते कडवे आव्हान देणार हे नक्की त्यामुळे ते यंदा बबनदादा शिंदे यांचे राजकीय गणितं बिघडवतात का स्वःता चे राजकीय बस्तान बसवतात याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे गेली सहा टर्म माढा विधानसभेला आमदार राहिलेले आमदार बबनदादा शिंदे यांचे या वेळी नियोजन व कार्यक्रम चुकला आहे अशी परिस्थिती आहे कारण आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या गटात गेले होते लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार यांची जादू चालणार असे वाटल्याने ते पुन्हा अजित पवार यांच्या गटाची साथ सोडून शरद पवार यांच्या कडे हेलपाटे मारत राहिले शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांनी त्यांच्या मुलांसाठी उमेदवारी मागितली पवार यांनी शेवट पर्यंत त्यांना झुलवत ठेवले व अचानक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना माढा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली मोहिते पाटील यांची ताकद अभिजित पाटील यांना दिली पक्षाचा एबी फार्म खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते अकलूज येथे अभिजित पाटील यांना दिला यामागे शरद पवार यांची मोठी राजकीय खेळी आहे बबनदादा शिंदे हे या वेळी निवडणूक लढवणार नाहीत त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना ते अपक्ष म्हणून निवडणूकीत उभे केले आहे रणजितसिंह शिंदे यांचा एकंदरीत स्वभाव व गेल्या तीन वर्षांत त्यांचे बद्दल तक्रारी न्यायालयात केसेस यामुळे ते वादग्रस्त ठरले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर माढा विधानसभा निवडणुकीत कोण कोणाचे राजकीय गणितं बिघडवणार हे येत्या तेवीस नोव्हेंबरला कळणार आहे मात्र या वेळी ही निवडणूक बबनदादा शिंदे यांचे मुलाला सोपी राहिलेली नाही हे निश्चित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button