solapur

श्री श्री सद्गुरु कारखाना राजेवाडी कडून 150/- प्रति टन प्रमाणे ऊस बिल खात्यात जमा

श्री श्री सद्गुरु कारखाना राजेवाडी कडून 150/- प्रति टन प्रमाणे ऊस बिल खात्यात जमा

संचार वृत्त अपडेट 

 माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरु साखर कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम 23/24 मध्ये गळितास आलेल्या सर्व ऊस उत्पादकांना दीपावली सणानिमित्त प्रति टन 150/- प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन एन शेष गिरी राव यांनी दिली मागील हप्ता 2700 अधिक आत्ता दिलेला हप्ता दीडशे रुपये असे एकूण 2850/- शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्यावर जमा झाले आहेत मागील बारा हंगामामध्ये मिळालेल्या दराचा विचार करून सद्गुरु साखर कारखान्याबरोबर आपली बांधिलकी व विश्वासार्था कायम ठेवावी असे आव्हान व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे
यावेळी कारखान्याचे मँनेजिंग डायरेक्टर उदयसिंह जाधव व सर्व खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी कारखाना 2850/-, श्री श्री सद्गुरु कारखाना राजेवाडी 2850/-, दि सासवड माळी कारखाना माळीनगर 2750/-, शंकर सहकारी कारखाना सदाशिवनगर 2700/-, सहकार महर्षी कारखाना शंकर नगर 2600/- याप्रमाणे कारखान्यांनी बिल वाटप केलेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button