दि सासवड माळी साखर कारखान्याचे 150/- प्रमाणे ऊस बिल खात्यात जमा
दि सासवड माळी साखर कारखान्याचे 150/- प्रमाणे ऊस बिल खात्यात जमा
संचार वृत्त अपडेट
माळीनगर येथील दि. सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड या कारखान्याच्या व्यवस्थापनाने गळीत हंगाम 23/24 मध्ये गळितास आलेल्या ऊस उत्पादकांना दीपावली सणानिमित्त सभासदांची दीपावली गोड करण्याकरता प्रति टन 150/ प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.पहिला हप्ता 2600/अधिक आता दिलेला 150/असे एकूण 2750/आज रोजी दिले आहेत.
सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत असतानाच माळीनगर कारखान्याच्या प्रति कायमस्वरूपी विश्वास ठेवून आपला ऊस दि सासवड माळी साखर कारखान्याकडे संपूर्णपणे द्यावा अशी अशा कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केली व दि सासवड माळी साखर कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचाच सुरुवातीपासून विचार करीत असताना वजन काटा पारदर्शक राजकारण विरहित कामकाज व गळितास आलेल्या ऊसास प्रत्येक वर्षी चाचणी हंगामापासून चांगला दर देणारा कारखाना हा नावलौकिक कायम ठेवण्याचे काम कारखाना व्यवस्थापनाने केले आहे उत्कृष्टपणे व काटकसरीने चालवला आहे.