उल्हास नवभारत साक्षरता मेळावा अंतर्गत कार्यक्रमात माळशिरस तालुक्यातील शैक्षणिक साहित्य सादरीकरण सर्वांचे लक्षवेधी ठरले

उल्हास नवभारत साक्षरता मेळावा अंतर्गत कार्यक्रमात माळशिरस तालुक्यातील शैक्षणिक साहित्य सादरीकरण सर्वांचे लक्षवेधी ठरले
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
नव साक्षरांना विविध माध्यमातून साक्षर करण्यासाठी विविध विषयावर शैक्षणिक साहित्यांची मांडणी करण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्यांची मांडणी यामध्ये माळशिरस तालुक्यातील शिक्षकांनी आहार व आरोग्य या विषयावरील स्टाॅलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची उल्लास नवभारत साक्षरता वरील स्टॉलला भेट देऊन प्रशंसा केली.
सोलापूर येथे ज.रा. चंडक विद्यालयात नुकताच उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम जिल्हास्तरीय मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.नव साक्षरांना विविध माध्यमातून साक्षर करण्यासाठी विविध विषयावर शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती.
यावेळी माळशिरस तालुक्यातून विभागीय स्तरावर दाखल केलेल्या आहार व आरोग्य या विषयावर शिवलिंग बाबुराव गुमे (केंद्र-खुडूस) श्रीम.सोनी प्रभाकर कानडे (केंद्र कन्या माळशिरस),सिध्देश्वर बसवराज घोगरे (केंद्र- इस्लामपूर) शिक्षकांनी आकर्षक नाविन्यपूर्ण स्टॉलची उभारणी केली होती.या शैक्षणिक स्टॉलला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,शिक्षणाधिकारी (योजना) सौ.सुलभा वटारे मॅडम यांनी भेट दिली.नवसाक्षरांसाठी राज्य शासनाने व केंद्र शासनाने आजपर्यंत सुरू केलेल्या विविध योजनांच्या प्रतिकृती या स्टॉलमध्ये मांडण्यात आल्या होत्या.आरोग्याचा शंकू,पोषण आहाराची बाराखडी तसेच सर्व साहित्यांचे केलेले सादरीकरण पाहून साहित्याचे कौतुक केले.
यावेळी जिल्ह्यातील विविध नवसाक्षर,स्वयंसेवक यांनीही स्टॉलला भेटी देऊन विषयाचे महत्त्व जाणून घेतले.
उल्हास नवभारत साक्षरता मेळावा यामध्ये साहित्याची मांडणी केलेल्या शिक्षकांचे माळशिरस तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार करडे,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सुषमा महामुनी मॅडम,बी.आर.सी. विषयतज्ञ विनोद चंदनशिवे यांनी नवसाक्षर व स्वयंसेवक यांचे कौतुक केले.