धर्मपुरी येथे सैनिक पत्नी व सैनिक माता यांचा सन्मान

धर्मपुरी येथे सैनिक पत्नी व सैनिक माता यांचा सन्मान.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभाग यांच्या वतीने १५ जानेवारीचा आर्मी डे व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सैनिक पत्नी व सैनिक माता यांचा सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष शिवमती सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य संघटक आकाताई माने,प्रियाताई नागणे तसेच जिल्हाध्यक्ष शिवमती मनोरमाताई लावंड यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
संसार रुपी रथाची दोन चाकाने चालत असतात.त्यातील एक चाक सैनिकाची पत्नी असून दुसरे चाक आपला पती देशसेवा करत भारत मातेचे रक्षण करत सिमेचे संरक्षण करीत आहेत ही या महिला जाणून त्या घरात सुखा समाधानाने संसार करीत असतात.त्यांच्या ही मनातील काही इच्छा असले तरी त्याचा त्याग करून आपल्या पतीला देश सेवेला पाठवत आहे आणि पाठीमागे पूर्ण संसार सत्ता सांभाळत असतात त्यांच्या या त्यागाला सलाम करण्यासाठी व त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने या सत्कार समारंभाचे आयोजन जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभागाच्या कार्याध्यक्षा शिवमती मनिषा जाधव यांनी केले होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संघटक शिवमती प्रियाताई नागणे,जिल्हा अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड,शिवमती शारदा चव्हाण,शिवमती शुभांगी क्षीरसागर,शिवमती आशा सावंत यांच्यासह सैनिक पत्नी,सैनिक माता व सहभागी महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.