solapur

फुले ,शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोशियन ( एनजीओ) या संस्थेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी सोमनाथ खंडागळे यांची निवड

फुले ,शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोशियन ( एनजीओ) या संस्थेच्या
सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी सोमनाथ खंडागळे यांची निवड

संचार वृत्त अपडेट 

 फुले ,शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोशियन ( एनजीओ) या संस्थेच्या ठाणे (मुंबई )महाराष्ट्र, या सामाजिक व राज्यस्तरीय शासकीय नोंदणीकृत ट्रस्टच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार सोमनाथ खंडागळे यांची  फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हिंगोले मुंबई यांनी ही निवड केली आहे. महा. शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिककार्य करणारे सोमनाथ खंडागळे यांचे नाव राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सुचविले होते. तसे मुख्यालय भिवंडी मुंबई येथून आज सोमनाथ खंडागळे यांना पत्र येत या अग्रेसर ट्रस्टच्या “सोलापूर जिल्हा अध्यक्ष” पदावर नियुक्ती करण्यात आले. याबाबद अकलूज सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार व सामाजिक क्षेत्रात सोमनाथ खंडागळे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन ही शासनमान्य व महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. यामध्ये या फाऊंडेशन कडून आरोग्य सुविधा, औषधी पुरवठा, अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कृत्रिम हात पाय, खेळोत्तेजक प्रशिक्षणासाठी ५०% भांडवल, युवा बेरोजगारांना विविध रोजगार उपलब्ध, विधवा, तृतीयपंथींना ५०% भांडवल देत व्यवसाय संधी, गोरगरीब शेतकऱ्यांना कृषी साहित्य अवजारे, औषधी यात १०% भांडवल, चालकांना वाहन खरेदीसाठी ५०% भांडवल व २ लाखांचा अपघात विमा, शासन अनुदानित खेळ, प्रशिक्षण, स्पर्धा करीता ५०% भांडवल, कर्जबाजारी गरीब व्यक्तींना ५०% रक्कम फाऊंडेशनतर्फे देत त्यांना पुन्हा व्यवसायात खंबीर करणे अश्या विविध सेवाकार्य ही राज्यस्तरीय फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन संस्था करीत आहे. आज महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी अकलूज येथील पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांचे नाव मुंबईला सुचविले. त्यातच त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारिणी मध्ये “सोलापूर जिल्हा अध्यक्ष” या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र आज अकलूज त्यांना प्राप्त झाले. नवनियुक्त अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी सांगितले की, आता कोणत्याही गोरगरीब जनता, विधवा महिला, युवा सुशिक्षित बेरोजगार, दिव्यांग व्यक्ती, गरीब शेतकरी व सामान्य व्यापारींना यापुढे त्रास होणार नाही. आणि सदर फाऊंडेशन सातत्याने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपले सदस्यगण नोंदणी पूर्ण करीत यांचा प्रत्येक सामान्य जनतेला लाभ दिला जाईल असे सांगितले.
सोमनाथ खंडागळे यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय “फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन” च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद, तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सोमनाथ खंडागळे यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button