फुले दाम्पत्या प्रमाणे,शाहू महाराज,साठे,होळकर यांना पुरस्कार देण्यासाठी ठराव करण्याची मागणी
फुले दाम्पत्या प्रमाणे,शाहू महाराज,साठे,होळकर यांना पुरस्कार देण्यासाठी ठराव करण्याची मागणी
संचार वृत्त अपडेट
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी त्यांच्या कार्यालयात निवेदन देवून महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी ठराव केल्याप्रमाणे छत्रपती,शाहूमहाराज,अहिल्यादेवी,होळकर,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी विधानसभेत शिफारस करणारा ठराव करावा अशी मागणी केली आहे.राज्यात चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी विधानसभेमध्ये ठराव करण्यात आला आहे.त्याबद्दल आपले मनापासून आभार व अभिनंदन.मूळात राज्य सरकारला शिफारशीचा अधिकार आहे का ? याचाही खुलासा राज्य सरकारने करणे गरजेचे आहे.असे निवेदनात महाराष्ट्र विकास सेना पक्षाने नमूद केले आहे.तसेच राज्यातील छत्रपती शाहू महाराज,अहिल्यादेवी होळकर,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे हे सुद्धा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी आहेत,त्यांचेही राज्यात मोठे काम असून त्यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी विधानसभेत शिफारशीचा ठराव करण्यात यावा अशी मागणी पक्षप्रमुख किरण साठे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.