solapur

आता बोलणार नाही करून दाखवणार; प्रशांत परिचारक

राजकीय घडामोडींवर प्रशांतराव परिचारक यांचे सुचक वक्तव्य आता बोलणार नाही करून दाखवणार

बी.टी.शिवशरण मुख्य संपादक

आज श्रीपूर मध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चौतीसावा बायलर अग्नी प्रज्वलित कार्यक्रम झाला त्या दरम्यान पत्रकारांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना राजकीय परिस्थितीवर त्यांना विचारले असता ते म्हणाले मी आता बोलणार नाही करुन दाखवणार आहे या त्यांच्या सुचक व गर्भित इशारा नेमका कुणाला याची चर्चा रंगली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आमदार समाधान आवताडे यांना सोडण्यात आला आहे त्यामुळे परिचारक हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात आहे त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी त्यांच्या वर दबाव आणला आहे कोणत्याही परिस्थितीत जनतेतून यावेळी निवडून जायचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी भगिरथ भालके यांनीही तुतारी हातात घेऊन निवडणूक लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे प्रशांतराव परिचारक यांचे पुढे पेच निर्माण झाला आहे गेल्या महिन्यात भगिरथ भालके व परिचारक यांचे एकत्रित कार्यक्रम झाले आहेत कदाचित ते दोघं एकत्र आले तरी उमेदवारी कोणी घ्यायची हा प्रश्न शिल्लक रहातोच परिचारक यांनी तुतारी हातात घेऊन निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी पांडुरंग परिवार यांनी केली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील सुधाकरपंत परिचारक प्रशांतराव परिचारक यांचा पराभव केला आहे भारत भालके यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी भाजपचे तिकीटावर निवडणूक लढवली होती त्यांना पांडुरंग परिवार व प्रशांत राव परिचारक यांनी तन मन धन वेचून आपली पुर्ण ताकद लाऊन समाधान आवताडे यांना निवडून आणले आहे पांडुरंग परिवार यांचे मुळे समाधान आवताडे आमदार झाल्याचे संपूर्ण मतदारसंघात बोललं जाते जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून उमेदवारी मिळाली तर प्रशांतराव परिचारक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक निश्चित लढवतील जर उमेदवारी नाही मिळाली तर ते अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याच्या मनस्थितीत आहेत भाजपने विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे धोरण ठेवले आहे त्यामुळे परिचारक यांची सामाजिक राजकीय मोठी ताकद असतानाही उमेदवार निवडीचा घोळ त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण ठरला आहे ते या वेळी नेमका काय निर्णय व भुमिका घेतात याकडे सोलापूर जिल्ह्याचे व परिचारक कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button