solapur

जनतेचा कौल मान्य; खचून जाऊ नका माजी आमदार राम सातपुते यांचा कार्यकर्त्यांना दिलासा

जनतेचा कौल मान्य; खचून जाऊ नका

माजी आमदार राम सातपुते यांचा कार्यकर्त्यांना दिलासा

संचार वृत्त अपडेट 

लोकशाहीमध्ये जनतेचा कौल अंतिम असतो आणि तो आम्ही पूर्णपणे मान्य करतो. या निवडणुकीत आमच्या कार्यकत्यांनी जीवापाड मेहनत घेतली, घराघरात जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवली. सर्वच उमेदवारांनी प्रचंड आत्मविश्वासाने आणि पूर्ण ताकदीने लढत दिली. तरीही जो निकाल लागला, तो मान्य करत जास्त निराशाजनक नाही जनतेने आम्हाला ही नाकारले नाही.जनतेचा कौल मान्य; आत्मचिंतन करू, खचून जाऊ नका असे म्हणत भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी कार्यकत्यांना दिलासा दिला आहे.
सर्वसामान्य घरातील, रस्त्यावर उतरून पक्षासाठी झटणारे, कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते यांना न्याय देण्याची भूमिका आमची आणि पक्षाची होती. मात्र, निकाल हा आपले उमेदवार कमी जागेवर विजय झाल्या ने अशा प्रामाणिक आणि कष्टकरी कार्यकत्यांच्या मनोबलावर घाव घालणारा ठरला आहे. असे सातपुते म्हणाले. माळशिरस तालुक्यातील जनतेविषयी आमच्या मनात कोणताही आक्षेप नाही. जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही विनम्रपणे स्वीकारतो.या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. पराभव शेवट नाही, आपण स्वबळावर लढलो पक्षातील कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, आपण आत्मचिंतन करू, चुका ओळखू, आवश्यक त्या सुधारणा करू आणि पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जोमाने मैदानात उतरू अशा शब्दात कार्यकर्त्यांना दिलासा देत आमदार सातपुते यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

संघर्ष हीच आपली ओळख

संघर्ष हीच आपली ओळख असून त्यातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू असे सांगत अकलूज नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदनही केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button