स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
संचार वृत्त अपडेट
सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात स्थानिक युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ७०लोकांनी रक्तदान केले. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार राम सातपुते यांची उपस्थिती लाभली. त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असल्याचे सांगितले. अनेक तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.शिवजयंतीच्या पवित्र निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिराला युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.अक्षय वायकर यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांप्रमाणे समाजहिताचे कार्य हीच खरी राष्ट्रसेवा आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांना नवजीवन मिळते,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने रक्तसंकलन करण्यात आले.शिवजयंतीनिमित्त पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देत मानवतेचा जागर करण्यात आला.
यावेळी अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे,अक्षय वायकर, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, विधानसभा प्रमुख निलेश नणवरे, नगरसेवक महेश शिंदे, राहुल लोंढे.सीमा एकतपुरे, दीपाली वाघमोडे,अमित टिळेकर,अनिल बनपट्टे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, कुणाल चव्हाण, पप्पू चव्हाण, अंबर वाईकर, युवराज चव्हाण, राहुल चौगुले, रंजीत पवार, विशाल पवार,अमोल माने,पप्पू काळे, दीपक बोरकर, सुमित बनपट्टे, शंकर कुंभार सह स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



