महात्मा बसवेश्वरांचा अर्धपुतळा मोफत देणार : उत्कर्ष शेटे

महात्मा बसवेश्वरांचा अर्धपुतळा मोफत देणार : उत्कर्ष शेटे
संचार वृत्त अपडेट
शिवनिर्णय संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांची शिदोरी (पुतळा)
लिंगायतांच्या प्रत्येक घरोघरी देणार आहे लिंगायत समाज बांधवांना प्रत्येक कुटुंबास एक याप्रमाणे महात्मा बसवेश्वर यांचा एक फूट उंचीचा आकर्षक रंगीत अर्धपुतळा समारंभपूर्वक मोफत देण्यात येणार आहे.याअंतर्गत इच्छुकांच्या ऑनलाईन माहिती भरावयाच्या नोंदणी पत्रक लिंकचे उद्घाटन शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील यांना माहिती देऊन शुभहस्ते लिंक शेअर करण्यात आली. यावेळी शिवनिर्णय संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष उत्कर्ष शेटे,चंद्रकांत कुंभार,अरुण तोडकर,महेश शि.शेटे,उमेश गुळवे,राजू गाढवे,महेश डिकोळे लिंगायत बांधव उपस्थित होते.