अकलूज नगर परिषदेस तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाने याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे

अकलूज नगर परिषदेस तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
प्रशासनाने याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी आणि शंकरनगर हे शंकरनगर येथे एकच तलाठी कार्यालय सुरू होते परंतु २०२४ पासून माळेवाडी सजा वेगळा निर्माण झाला आहे.माळेवाडी येथे तलाठी कार्यालयास जागा उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे.गेली अनेक वर्ष माळेवाडी येथील शेतकऱ्यांची माळेवाडीत तलाठी कार्यालय असावे अशी मागणी होती. परंतु हे तलाठी कार्यालय शंकरनगर या ठिकाणी असल्यामुळे वयोवृद्ध, शेतकरी वर्ग, विद्यार्थी आणि नागरिक यांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत होता.यातून पर्याय मार्ग काढण्यासाठी भाजप सरचिटणीस अमित टिळेकर यांनी पुढाकार घेऊन माळेवाडी येथे तलाठी कार्यालयास जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी अकलूज नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सचिन पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करण्यासाठी अतिशय अडचणीला सामोरे जावे लागत आहे. माळेवाडीसाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर झाले आहे.पण या तलाठी कार्यालयाला उपलब्ध जागा होत नसल्यामुळे तलाठी माळेवाडी गावात बसत नाही.
यावेळी अमित टिळेकर सरचिटनिस,अकलूज, नगरपरिषदेच्या नगरसेविका जयश्री एकतपुरे,दिपाली वाघमोडे,विक्रांत देशमाने,अमोल माने,नवनाथ साठे,महेश शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.दीड वर्षापासून माळेवाडी येथील नागरिकांचा तलाठी कार्यालयासाठी संघर्ष चालू आहे.जागा उपलब्ध न केल्यास लवकरच अकलूज नगरपरिषदेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रशासनाने याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सातबारा उतारे, विविध दाखले, शेतीविषयक कामे तसेच शासकीय कागदपत्रासाठी शंकरनगर येथे जावे लागते जेष्ठ नागरिक,महिला व शेतकरी वर्गाला प्रवासाचा व वेळेचा त्रास सहन करावा लागत आहे वेळ व खर्च वाढत आहे प्रशासनाने याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे व गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा आहे.
अमित टिळेकर
भाजप सरचिटणीस



