solapur

अमोल माने यांची अकलूज शहर सरचिटणीस पदी निवड  माझी निवड अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारी ; अमोल माने 

अमोल माने यांची अकलूज शहर सरचिटणीस पदी निवड 

माझी निवड अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारी ; अमोल माने 

संचार वृत्त अपडेट 

भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांनी पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी अमोल माने यांची सरचिटणीस पदी निवड केली मा.आमदार राम सातपुते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

भाजप पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करुन 
 सरचिटणीसपदी माझी निवड झाल्याबद्दल मी  मा.आमदार राम सातपुते, महादेव कावळे,सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून, भाजप पक्षाच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारी आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरचिटणीस अमोल माने यांनी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले की, “भाजप पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज करणे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन भाजप पक्ष अधिक मजबूत करणे आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे, हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. सर्वसामान्य जनतेचा विश्वास व सहकार्य हेच माझे खरे बळ आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सातपुते व कावळे यांच्या नेतृत्वाखाली कामगिरी अधिक उंची गाठेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.यावेळी अकलूज शहर भाजप अध्यक्ष महादेव कावळे,निलेश ननवरे, सचिन शिंदे, नगरसेवक राहुल लोंढे, नगरसेवक महेश शिंदे, दत्ता पवार, रोहन शिंदे, अमित टिळेकर,समिर माने,नवनाथ साठे ई.मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button