solapur

चंद्रप्रभू स्कूलची सहल म्हणजे साहस आणि अभ्यास

चंद्रप्रभू स्कूलची’ सहल म्हणजे साहस आणि अभ्यास

नातेपुते प्रतिनिधी– येथील चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम स्कूलने जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून प्रसिद्ध Satue of Unity एकतानगर, गुजरात स्थित स्मारकास भेट देवून अभ्यास दौरा पूर्ण केला. संस्थेचे चेअरमन नरेंद्र गांधी यांच्या संकल्पनेतून सेक्रेटरी विरेंद्र दावडा आणि सर्व गव्हर्निंग काऊन्सिल मेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यध्यापिका शितल ढोपे यांच्या नियोजनाखाली हा अभ्यास दौरा आखला होता.

भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे Statue of Unity . सरदार वल्लभभाई पटेल यांचे अखंड भारताच्या निर्मिती आणि एकात्मता ठेवण्यामध्ये असणारे योगदान म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गुजरात सरकारने त्यांचा सरदार सरोवर धरण येथील नर्मदा नदीतील साधू बेटावर ४२ महिन्यात जवळपास ३००० कोटी खर्च करून १८५०० मेट्रिक टन लोखंड, १७०० मेट्रिक टन ब्राँझ, ७० हजार मेट्रिक टन सिमेंट वापरून ३० ऑक्टोंबर २०१८ रोजी जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा लोकार्पण केला. यासंबंधीचा इतिहास आणि रचना याची माहिती इतिहास शिक्षक संजय वलेकर यांनी विद्यार्थ्याना दिली.

Satue of Unity सारखे महाकाय, उंच प्रकल्प कसे केले जातात शिवाय भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल ठिकाणी कशाप्रकारे साकारले जातात. यासर्वांचा अभ्यास करण्यासाठी चंद्रप्रभू स्कूलने याठिकाणी अभ्यास दौरा काढला होता. पुतळा सह येथील फ्लॉवर व्हॅली, नर्मदा नदीवरील धरणाची रचना, विविध वन्य गार्डन त्यावरील लाईट इफेक्ट यासर्वांची विद्यार्थ्यानी बारकाईने माहिती घेतली. याबरोबरच पश्चिम घाट नैसर्गिक साधन संपत्ती, जंगल व पशुप्रणी, आदिवासी जनजीवन बरोबरच काळाराम मंदिर, सीता गुफा, पंचवटी गोदावरी सह नैसर्गिक व सांस्कृतीक वारसा यासर्वांची विद्यार्थ्यानी माहिती घेतली.

चंद्रप्रभू स्कूलने अभ्यास दौऱ्या सह गुजरात राज्याची सहल यशस्वी रित्या पार पाडली. Statue of Unity बरोबरच जगातील सर्वांत शांत ठिकाण श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपुर याठिकाणी भेट देवून आध्यत्म, ध्यान, विनम्रता आणि मौन यांचे मोल याची जाणीव विद्यार्थ्याना करुन दिली. यावेळी मिशन मधील शांतता, नैसर्गिक सुंदरता व स्वच्छता विद्यार्थ्याना भावली. याचवेळी मिशन चे सर्वेसर्वा परम पूजनीय राकेश जी यांचे दर्शन झाले. एवढ्या दूरच्या सहलीचे ट्रस्टचे विश्वस्त श्री. भारतभाई मेहता यांनी कौतुक केले व मिशन ची सर्व माहिती दिली. यावेळी संस्थेच्या वतीने योगदान व सहकार्यबदल आभारपत्र दिले. यावेळी स्वामी नारायण महाराज नीलकंठ धाम पोईचा गुजरात याठिकाणी सुद्धा भेट देवून विद्यार्थ्यानी उत्तम वस्तुकलेचे निरीक्षण केले. शिवाय येथील भव्य मिरवणूकीत सामील होवून सायंकाळच्या आरतीत सहभाग घेतला.

अशाप्रकारे चंद्रप्रभू स्कूलने गुजरात राज्याची दूरची आणि धाडसी सहल आयोजित केली आणि ती यशस्वीपणे पार पाडली. याबद्दल पंचक्रोशीतील पालक वर्गातून चंद्रप्रभू स्कूलचे कौतुक केले जाते आहे. गुजरात सहलीचे वेगळेपण म्हणजे साहस आणि अभ्यास होय . सहलीत 70 विद्यार्थी आणि 5 शिक्षक सहभागी झाले होते.सदर प्रवासवृतांताची माहिती प्रशालेचे शिक्षक संजय वलेकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button