अकलूज मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाच शाखांचे उद्घाटन
अकलूज मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाच शाखांचे उदघाटन
नगरपरिषदेची निवडणुक स्वबळावर लढविण्याची घोषणा
संचार वृत्त अपडेट
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या अकलूजमध्ये समतानगर(कर्मवीर चौक,मसूद मळा),डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(आझाद चौक),जुना नाका(प्रतापसिंह चौक),गिरझनी चौक(महाराणा प्रताप चौक),विजय चौक येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते पाच शाखांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.उदघाटन प्रसंगी बोलताना पक्षप्रमुख किरण साठे यांनी शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शाखा उभारल्या असल्याचे सांगून अकलूज मधील जनतेच्या हितासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचा संकल्प शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असल्याचे सांगितले.त्यामुळे अकलूज नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.
यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख धनाजी साठे,जिल्हा सरचिटणीस धनाजी पाटील,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,बापूसाहेब वाघमारे,युवा सेना शहराध्यक्ष अजय माने,संघटक चेतन साठे,दहिगाव शहराध्यक्ष सचिन खिलारे,सुग्रीव गोरड,विठ्ठल जावीर,किसन खिलारे,सुनील सावंत,विकास केसकर, राहुल कुलकर्णी,किशोर ढावरे,सचिन साळुंखे,लखन चव्हाण,किरण खंडागळे,संदीप खंडागळे,आप्पा खंदारे,सैफन शेख,दत्ता जाधव,रफिक मुलाणी,बापू खरात,महादेव साठे,मारुती साठे,सोमनाथ साठे,युवराज पवार,पिंटू पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.