solapur

जुने एसटी स्टँड ते शंकर नगर,जयसिंह चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याचे डांबरीकरण करून खड्डे मुक्त रस्ते करावेत;अमोल माने

जुने एसटी स्टँड ते शंकर नगर,जयसिंह चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याचे डांबरीकरण करून खड्डे मुक्त रस्ते करावेत;अमोल माने

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथील जुने एसटी स्टँड शंकर नगर, जयसिंह चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक हे रस्ते डांबरीकरण करून खड्डे मुक्त करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र दोन यांना देण्यात आले
निवेदनात वरील रस्त्याची दयनीय व बिकट अवस्था झाल्याने नागरिकांना मोठमोठ्या खड्ड्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे याच रोड वरती क्रीडा संकुल असल्याने या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात यानिमित्ताने देशाचे व राज्याचे नेते येत असतात दौरा होणार आहे म्हटल्यावर बांधकाम विभागाला खडबडून जाग येते आणि रस्त्याला पडलेल्या खड्ड्याला माती मुरूम टाकून मलमपट्टी किती तेरा वेळा करण्यात आली आहे मुरमाच्या मातीच्या धुळीच्या त्रासाला जनतेला सामोरे जावे लागत आहे अनेक वर्षापासून हे रस्ते प्रलंबित आहेत तरी तात्काळ नवीन डांबरीकरण करावे काम वेळेत चालू न झाल्यास सामाजिक कल्याण एवं मानव मानव संरक्षण संघाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे पुढील होणारे तीव्र आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे उपाध्यक्ष तेजस भाई परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे अमोल माने यांनी सांगितले


यावेळी अमोल माने पश्चिम भारत अध्यक्ष, अश्विनी पांढरे तालुका महिला अध्यक्ष,शुभांगी मोरे पुणे विभाग अध्यक्ष, वंदना तिकोटे,तालुका महिला सरचिटणीस तानाजी वायदंडे तालुका अध्यक्ष,विष्णू केंगार तालुका उपाध्यक्ष,
रोहित टेके संग्राम नगर उपाध्यक्ष,मारुती तिकोटे,रोहित घोसाळकर ई.संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button