solapur

मोहम्मद पैगंबर यांचे जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी

मोहम्मद पैगंबर यांचे जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथे नारे तकबीर अल्लाहू अकबर,नारे रिसालत या रसुलुल्लाह,सरकार की आमद मरहबा ,बच्चा बच्चा कहता है नबी हमारा सच्चा है आदी घोषणा देत सर्व जगाला अमन शांती एकता बंधुता समतेचे संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची १५००, वी जयंती( ईद मिलादुन्नबी) येथे भव्य शोभा यात्रेने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


येथील काझीमोहल्ला येथून ईद मिलादुन्नबी जुलूसला (मिरवणुकीस) प्रारंभ झाला, ही मिरवणूक काझी गल्ली ,नगरपरिषद कार्यालय, जुने ग्रामपंचायत, हनुमान मंदिर, बागवान गल्ली ,आंबेडकर चौक, जुने एसटी स्टँड ,उपजिल्हा रुग्णालय, जुने पोलीस स्टेशन ,विजय चौक येथून परत त्याच मार्गाने बागवान गल्ली येथील कौलारू शाळेत येऊन त्याची सांगता झाली. यानंतर नातखानी व प्रेषितांच्या जीवनावर प्रवचन संपन्न झाले.


याप्रसंगी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सर्व जगाला अमन शांती समता बंधुता एकतेचा संदेश दिला त्याचे अनुकरण करणे काळाची गरज असून मला माढा लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाने मतदानाच्या रूपाने भरभरून प्रेम दिले त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे.
याप्रसंगी जामा मस्जिद बागवान गल्लीचे इमामानी प्रेषितांच्या जीवनावर प्रवचन केले
याप्रसंगी अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, जि. प. माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील,धनंजय देशमुख, सयाजीराजे मोहिते पाटील ,अभिजीत माने पाटील, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे ,पोलीस उपनिरीक्षक- साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button