solapur

बाल संस्कार व युवा प्रबोधन शिबिराचे आयोजन

बाल संस्कार व युवा प्रबोधन शिबिराचे आयोजन

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी मल्लिकार्जुन केंद्र(रामायण चौक)येथे बालसंस्कार व युवा प्रबोधन हिवाळी शिबिर होणार आहे तरी जास्तीत जास्त मुलांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये विविध Activities मुलांकडून करवून घेतल्या जाणार आहेत. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे वय वर्ष 3 ते 5 = “शिशुसंस्कार”,5 ते 15 =”बालसंस्कार”,आणि 15 वर्षानंतर ची मुले “युवा प्रबोधन” .याप्रकारे आपण सर्वांनी मुलं व मुलींनी यामध्ये सहभागी व्हावे.
या शिबिरामधून मुलांमध्ये नक्कीच चांगले संस्कार रूजवले जाणार आहेत. गुरुमाऊलींचे स्वप्न आहे की “वृद्धाश्रम मुक्त भारत “यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. गुरुमाऊली नेहमी म्हणतात की घरोघरी पुंडलिक व श्रावण बाळ तयार व्हावेत. ही संकल्पना हाती घेऊन आपण हिवाळी शिबिराचे आयोजन विद्यार्थी व पालक यांच्यासाठी केले आहेत तरी सर्व विद्यार्थ्या विद्यार्थी व पालकांनी हजर राहावे.
वेळ.सकाळी 10 वाजता
मुलांनी येताना सोबत जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल घेऊन येणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button