आनंदनगर येथे श्री जोतिबा मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशरोहन समारंभ संपन्न.

आनंदनगर येथे श्री जोतिबा मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशरोहन समारंभ संपन्न.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे)
आनंदनगर (ता.माळशिरस) येथे श्री जोतिबा मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशरोहन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी लाभ घेतला.
काल श्री जोतिबा मुर्तीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली होती.हि भव्य मिरवणूक काटकर वस्ती येथून निघून हनुमान मंदिर ते आनंदनगर पर्यंत काढण्यात आली.यामध्ये हालगी ढोल ताशा सनई या पारंपरिक वाद्यांसह महादेव काटकर यांचा अश्व मोठ्या दिमाखात सहभागी झाला होता.
या मिरवणूक मार्गातील सुवासिनी महिलांनी अश्वाची व रथातील श्री जोतिबा मुर्तिची मनोभावे पूजा केली.या कार्यक्रमाचा धार्मिक विधी व होमहवन वेदशास्त्र संपन्न सुनिल मुदगल शास्त्री यांनी केले तर जोतिबा मुर्तीची महापुजा श्री क्षेत्र जोतिबा (जि.कोल्हापूर) येथील पुजारी बाबुराव मिटके यांनी केली.कलशरोहनाचा कार्यक्रम ह.भ.प.सुरेश सुळ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.सकाळी १० ते १२ वाजता आनंदनगर भजनी मंडळचा भजनाचा कार्यक्रम व ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे (देहूकर) यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर आरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमानंतर माहेरवाशीण महिलांना कमेटीकडून माहेरची साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स.म.शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते- पाटील,युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक वसंतराव जाधव, रामभाऊ गायकवाड हे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी रवि काटकर, जालिंदर काटकर,राजेंद्र काटकर,वेताळ काटकर,ज्ञानेश्वर काटकर,मारूती काटकर, सोमनाथ घाडगे,पांडुरंग पवार,महादेव चव्हाण,चांगदेव भांगे,शरद कांबळे,रघुनाथ काटकर,रामभाऊ काटकर, सरपंच राजेंद्र लोंढे,उपसरपंच बाळू काटकर,राजेंद्र जाधव,बबन काटकर,बापू चिकणे,हेमंत चव्हाण,गंगाधर चव्हाण,विठ्ठल शेळमकर,लक्ष्मण काटकर, भिमराव भांगे,संतोष घाडगे, नाना काटकर,नवनाथ काटकर, शिवाजी सावंत,बबन चव्हाण, अशोक शेळमकर,दादा जाधव, शिवाजी पवार,प्रभाकर चव्हाण, कृषी अधिकारी ढगे साहेब, ग्रामविकास अधिकारी शेलार व समस्त आनंदनगर ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.