solapur

मधुकर सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

युवा उद्योजक मधुकर सावंत यांचा वाढदिवस विविध उप क्रमाने उत्साही वातावरणात संपन्न

संचार वृत्त अपडेट 

युवा उद्योजक मधुकर सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी आनंदीमय वातावरणात दसुर येथे संपन्न झाला. यावेळी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेळ पैठणीचा हा सिने अभिनेते रमेश परळीकर यांचाभारदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी होम मिनिस्टर ठरलेल्या महिलांना पैठणी, टीव्ही, गॅस शेगडी, कुकर, तसेच मानाची पैठणी देण्यात आली. याबरोबरच उपस्थित सर्वच महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महिलांमधून विशेष कौतुक करण्यात आले .

मधुकर सावंत हे विकासप्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यावेळी विविध संस्था, मान्यवर मंडळी ,तसेच तालुक्यामधून मित्रपरिवार, युवावर्ग, यांच्याकडून त्यांच्या भावि कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर सावंत मित्रपरिवार सर्व, ग्रामस्थ तसेच केबीएस डेव्हलपर्स पुणेचे सर्वेसर्वा किरण शेठ सावंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बागल यांनी केले. तर आभार माजी सरपंच दादासो सावंत पाटील यांनी केले. कार्यक्रमास युवा वर्ग, ग्रामस्थ व विशेष महिलांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button