मयूर-साक्षी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

मयूर-साक्षी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
संचार वृत्त अपडेट
श्री.शैलजा व श्री. हरिभाऊ गोविंद कुलकर्णी यांची नात व सौ.अश्विनी व श्री.सचिन हरिभाऊ कुलकर्णी रा. अकलूज ता.माळशिरस यांची ज्येष्ठ कन्या ची.सौ. का साक्षी हिचा शुभविवाह ची.मयूर कै. सुशीला व श्री.कृष्णाजी संपतराव देशपांडे यांचे नातू व सौ.अश्विनी व श्री. मधुकर कृष्णाजी देशपांडे रा.अहिल्यानगर यांचे चिरंजीव यांच्याशी मोठ्या दिमाखात नक्षत्र लॉन्स बुरुडगाव रोड, अहिल्यानगर येथे नुकताच संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास फत्तेसिंह माने पाटील, बाबाराजे देशमुख, पांडुरंग भाऊ देशमुख, धनंजय भाऊ देशमुख, काकासाहेब माने पाटील, दादासाहेब घाडगे, संदीप देशमुख ,धनाजीराव इनामदार, संभाजी इनामदार ,विकासराव इनामदार, प्रशांत इनामदार ,रवी इनामदार, नातेवाईक आप्तेष्ट प्रतिष्ठित नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा विवाह सोहळा दोन दिवस चालला सोहळ्यामध्ये संस्कृती, परंपरा, संस्कार, यांचा अविष्कार पाहायला मिळाला चोख नियोजन पूर्वक अप्रतिम सजावट, रोषणाई फारच सुंदर होती स्वागत व स्नेहभोजनाचे नियोजन सुरेख होते. विविध खाद्यपदार्थांची मेजवानी यावेळी पाहायला मिळाली.