solapur

राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्काराने अभिजित शेळवणे यांचा गौरव!

राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्काराने अभिजित शेळवणे यांचा गौरव!

संचार वृत्त अपडेट 

 शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती (दसूर) येथील उपक्रमशील शिक्षक श्री. अभिजित राजाभाऊ शेळवणे यांना महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ (Ideal Teacher) पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशामुळे चव्हाणवस्ती (दसूर) शाळेसह अकलूज परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा घटक नसून भावी पिढी घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारा शिल्पकार असतो. ही भूमिका ओळखून अभिजित शेळवणे यांनी आपल्या अध्यापन कार्यात विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीला विशेष महत्त्व दिले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर धनाजी तुकाराम सावंत, बर्जंग दुर्योधन नलवडे आणि पत्रकार संजय निंबाळकर यांच्यासह मित्रपरिवार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने अभिजित शेळवणे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकाच्या कार्याला राज्य शासनाच्या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली ही पोचपावती निश्चितच प्रेरणादायी आहे. अभिजित शेळवणे यांचा हा सन्मान नव्या पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरणार असून, त्यांच्या या यशामुळे अकलूज परिसरातूनही समाधान व्यक्त होत आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button