अकलूज मध्ये ‘चिखल समृद्धी’ रस्ता बनला ‘डेंजर झोन’ नगर परिषद गांधारी च्या भूमिकेत

अकलूज मध्ये ‘चिखल समृद्धी’ रस्ता बनला ‘डेंजर झोन’ नगर परिषद गांधारी च्या भूमिकेत
संचार वृत्त अपडेट
अकलूज गुजर हॉस्पिटल समोरील रोडवर चेंबरचे काम झाले असले तरी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या परिसरात हॉस्पिटल व व्यावसायिक दुकाने असून गरोदर महिला व रुग्ण सतत ये जा करत असतात मात्र खराब रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे
पावसाने रस्त्यावर चिखल साचल्याने वाहनचालकास कसरत करावी लागत आहे त्यामुळे हा रस्ता असुरक्षित ठरला आहे ही अडचण नगरपरिषदेने सोडवावी अशी मागणी होत आहे.
गेल्या दहा दिवसापासून अकलूज नगर परिषदेला वारंवार सांगितले तरी अद्याप मुरूम टाकण्याचे काम झालेले नाही गाडी घसरून पडणे व रुतून बसणे ही परिस्थिती रोजचीच झाली आहे यासंदर्भात अकलूज नगरपरिषद गांधारींची भूमिका घेत आहे या रस्त्यावर अपघात झाल्यास अकलूज नगरपरिषद जबाबदार असेल
महेश शिंदे
सक्रिय सदस्य भारतीय जनता पार्टी



