solapur

आधुनिक युगातही (लक्ष्मीला) केरसुणीला अनन्य साधारण महत्व

आधुनिक युगातही (लक्ष्मीला) केरसुणीला अनन्य साधारण महत्व

संचार वृत्त अपडेट 

व्हॅक्युम क्लिनर, क्लिनिंग ब्रश आले तरी दिवाळीत लक्ष्मीपूजनाला असणारे केरसुणीचे महत्त्व तसूभरही कमी झाले नाही. उलट ते वाढले आहे. धनत्रयोदशीने दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. पूजनासाठी पूजा साहित्य, भांडी, सजावटीचे साहित्य खरेदीला वेग आला आहे. दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनात अजूनही केरसुणीचे महत्व टिकून आहे. परिणामी शनिवारी एका दिवसात अकलूजमध्ये केरसुणीची ५ लाखांची उलाढाल झाली.

दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनात केरसुणी ला अनन्यसाधारण महत्व आहे.या पार्श्वभूमीवर दिवाळी बाजारासोबतच लोक केरसुणी खरेदी घेतात. त्यासाठी अकलूजमध्ये नवीन बस स्थानक, सदुभाऊ चौक, विजय चौक, जुने बसस्थानक, महादेव मंदिर, गांधी चौक या परिसरात नुसत्या केरसुणीची सुमारे १०० वर दुकाने गेली ४ दिवसापासून थाटली आहेत. यामध्ये ३ वेगवेगळ्या आकारातील केरसुण्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून सर्वात लहान ८० मध्यम १०० तर लांब दांड्याची सर्वात मोठी १५० रुपये याप्रमाणे विक्री केली जात आहे. कुणाकडे १०० तर कुणाकडे ५० ते ८० केरसुण्यांची एका दिवसात विक्री झाली आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने दरात घासाघीस केली जात नाही.दराच्या घासघिसीबाबत बोलताना केरसुणी व्यापारी यांनी सांगितले की, केरसुणीचे फड आपल्याकडे मिळत नाहीत, ते कर्नाटकातून मागवावे लागतात. त्यामध्येही अलीकडे मोठ्या बंडल ऐवजी लहान बंडल येत आहेत. त्यामध्ये फार तर ८/१० केरसुण्या तयार होतात. त्यासाठी काठीने झोडपून फड लूज करावे लागतात. त्यास आकार देऊन नायलॉन दोरीने बांधावे लागते. त्यासाठी कुटुंबाचा दिवस खर्ची पडतो. ४०० रुपयांचा बंडल, १०० रुपयांचे नायलॉन व दिवसभर कुटुंबाने काम केल्यानंतर त्यामागे ६००/७०० रुपये

मिळतात.असे वसंत खंडागळे यांनी सांगितले.आता झाडलोटीसाठी वेगवेगळी साहित्य आल्याने एरव्ही केरसुणीला मागणी नसते, केवळ गौरी पूजन, लक्ष्मी पूजन व गुढी पाडव्याच्या सणालाच केरसुणीला मागणी असते. त्यात ही आता बनवणारे व विकणारे जास्त झाल्याने परवडत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button