solapur

गहिनीनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी शिरीष फडे

गहिनीनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी शिरीष फडे

संचार वृत्त अपडेट 

सद्गुरू गहिनीनाथ अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड अकलूजच्या अध्यक्षपदी माळीनगरचे अॅड. शिरीष फडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.सद्‌गुरू गहिनीनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक (सहकारी संस्था)पी. आर. सारडा होते. त्यांच्या देखरेखीखाली निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी अध्यक्षपदी अॅड. फडे यांची निवड झाल्याबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. फडे यांनी यापूर्वी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून २० वर्षे कामकाज पाहिले आहे. या निवडीप्रसंगी संमती सोनाज, डॉ. विठ्ठल कवितके, अजितकुमार गांधी, भरतेश वैद्य, नीलेश गिरमे, रमेश तोरणे, प्रभावती काळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे, राहुल देशपांडे कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.लक्ष्मण डोईफोडे व मच्छिंद्र हजारे माळीनगर ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार लक्ष्मीकांत कुरुडकर यांनी अभिनंदन करुन त्यांच्या भावि वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button