अकलूज येथे महात्मा बसवेश्वर यांच्या विटंबनेच्या निषेधार्थ माळशिरस तालुका वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने निषेध

माळशिरस तालुका वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने निषेध
संचार वृत्त अपडेट
कटक चिंचोली (कर्नाटक) गावातील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाज कंठकांनी विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ माळशिरस तालुका सर्व वीरशैव-लिंगायत समाज्याच्या वतीने निषेध करण्यात आला. आणि समाजकंटकावर कडक कारवाई व्हावी यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील कटक चिंचोली गावातील समतानायक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाज कंठकांनी विटंबना केली.या घटनेच्या निषेधार्थ अकलूज येथील बसवेश्वर चौकात माळशिरस तालुक्यातील सर्व वीरशैव-लिंगायत समाज्यातील सर्व संघटना, संस्था, समाज बांधव आणि बसव प्रेमी यांच्यावतीने निषेध करण्यात आला. या समाजकंटकावर कर्नाटक सरकारकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माळशिरस तालुक्यातील समस्त वीरशैव लिंगायत समाज्यातील महाराष्ट्र वीरशैव सभा, शिवा वीरशैव लिंगायत संघटना, महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समिती अकलूज, वीरशैव लिंगायत समाज मंडळ अकलूज, शिवनिर्णय संघटना, शिवशक्ती वीरशैव लिंगायत सामाजिक बहूउद्देशिय संस्था अकलूज, महात्मा बसवेश्वर बहूउद्देशिय संस्था अकलूज तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.