solapur

लहानापासून ज्येष्ठा पर्यंत विकासाचे व्हिजन नगराध्यक्षपदी संधी द्या ; पूजा कोतमिरे

लहानापासून ज्येष्ठा पर्यंत विकासाचे व्हिजन नगराध्यक्षपदी संधी द्या ; पूजा कोतमिरे

संचार वृत्त अपडेट 

भाजप पुरस्कृत अकलूज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पूजा कोतमिरे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. विविध प्रभागात मतदारांच्या बैठका घेऊन अकलूज शहराच्या विकासाचे व्हिजन सांगत आहेत. माझ्यासारख्या सुशिक्षित महिलेला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळावी असे आव्हान ते करत आहेत.
शहरातील बहुतांश भागात त्यांनी जनसंपर्कावर भर दिला आहे.मतदारांच्या भेटीत ते शहरातील मूलभूत गरजा,वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे प्रश्न, सर्वसामान्याच्या मुलांना स्टेडियमवर चा वापर व्हावा,जलतरण तलावात शहरातील सर्वसामान्यांच्या मुलांनाही प्रवेश मिळावा चांगले जलतरणपटू तयार व्हावेत.शहरातील रस्त्या बरोबरच अनेक भागात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे.अशा भागाला समान आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.
नगरपरिषदेच्या महिला विभागामार्फत महिलांना विविध प्रशिक्षणामधून स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष असा कार्यक्रम हाती घेण्याचे आश्वासन ते देत आहेत शहरातील लहानापासून ज्येष्ठापर्यंतच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.
नागरिकांनी साथ द्यावी शहराचा चेहरा मोहरा बदलू अशी ग्वाही ते मतदारांना देत आहेत. गेल्या काही दिवसापासून शहराच्या विविध भागात प्रचार करत असताना प्रश्न दिसत आहेत बोळ रस्त्यावर भुयारी गटार योजनेसाठी खोदाई करण्यात आल्यानंतर गेल्या अनेक महिन्यापासून हे रस्ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. ते काम जलद गतीने करून रस्ते टकाटक करण्याचे ते सांगत आहेत नगराध्यक्ष झाल्यानंतर शहरासाठी काय करू शकते याचा मतदारांनी विचार करून माझ्यासारख्या सुशिक्षित महिलेला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशे आव्हान कोतमिरे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button