पहिले उचल ३०५०/- रु.देण्यास भाग पाडल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा विविध स्तरातून सन्मान

पहिले उचल ३०५०/- रु.देण्यास भाग पाडल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा विविध स्तरातून सन्मान
संचार वृत्त अपडेट
यावर्षी प्रथमच माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसदर वाढीसाठीचे आंदोलन माळशिरस तालुक्यातील सर्व साखर कारखाना परिसरात तीव्र आंदोलन करून शेतक-यांमध्ये ऊसदर वाढीसाठीची जनजागृती करण्याचे काम शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी मोठ्या जोमात आंदोलन केले.त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना समाधानकारक ऊसाला दर मिळाला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे ऊसाला भरीव दरवाढ मिळाल्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा गावागावात सन्मान होवू लागला आहे.

आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर,ज्येष्ठ नेते मगन काळे,भानुदास सालगुडे पाटील, अमरसिंह माने देशमुख,सचिन शेंडगे, राहुल ढेरे, गोपाळ घाडगे,राहुल बिडवे, दत्ता भोसले, दीपक सावंत, कमलाकर माने देशमुख, मदन जाधव, व शेतकरी वर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

खंडकरी शेतकऱ्यांचे नेते सोमनाथ (अण्णा)वाघमोडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक सुरेश टेळे,नगरसेवक कैलास वामन, शिवसेनेचे तानाजी भोळे, अशोक शिंदे, दादासाहेब पाटील, रमेश देशपांडे, रमेश शिंदे, विठ्ठल शिंदे, संभाजी वाघमोडे, लक्ष्मण रेडे पाटील,माळीनगर येथील विजय नेवशे व त्यांचे सहकारी,विजोरी येथील कैलास इंगळे, तरंगफळ येथील संजय वाघमोडे यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सन्मानाच्या वेळी उपस्थित होता.



