समाज प्रबोधनात पत्रकाराचे योगदान अतुलनीय;डाँ.मनिष गायकवाड धनशैल्य शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

समाज प्रबोधनात पत्रकाराचे योगदान अतुलनीय;डाँ.मनिष गायकवाड
धनशैल्य शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
संचार वृत्त अपडेट
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त औचित्य साधून धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज यांच्या वतीने कीडझी अकलूज येथील पत्रकारांचा फेटा,शाल व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ.मनिष गायकवाड यांच्या प्रास्ताविकाने झाली.त्यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत समाज प्रबोधनात पत्रकारांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी संस्थेचे संचालक अभिषेक टेके,आकाश बनकर, अयोध्या ज्वेलर्सचे नवनाथ नागणे आणि ओम रिमेडीजचे ओजस दोभाडा यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन भक्ती कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी केले.
या सत्कार समारंभ कार्यक्रमात करण्यात आला पत्रकार कृष्णा लावंड,शशिकांत कडबाने,नागेश लोंढे,शिवाजी पालवे,लक्ष्मीकांत कुरूडकर,विलास गायकवाड, निलकंठ हजारे,संजय लोहकरे,केदार लोहकरे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



