solapur

सयाजीराजें च्या बैठकीने व्यापारी वर्ग आशावादी

सयाजीराजें च्या बैठकीने व्यापारी वर्ग आशावादी

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या कार्यशैलीची झलक अकलूजकरांना पाहायला मिळाली. या दौऱ्यामुळे व्यापारी वर्गाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. सयाजी राजे यांच्या बैठकीमुळे त्यांच्या कार्यशैलीचा प्रत्यय आल्याने व्यापारी वर्ग आशावादी झाला आहे. व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी तक्रारी ऐकून घेण्यासाठी व्होरा ज्वेलर्सच्या दालनात सयाजीराजे यांच्या उपस्थितीत व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली.तक्रारी ऐकून घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना त्यांनी दिल्या विकास कामाबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मुद्देसूद प्रश्नामुळे अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी लागली. अकलूजचा विकास वेगाने पुढे जावा यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना अधिकार्यांना दिल्या सयाजीराजे यांच्या कामकाजातील बारकाई,थेट संवाद, आणि कार्यक्षमता पाहून व्यापारी वर्गाने ‘बाळदादांची छबी’ असल्याची भावना व्यक्त केली अकलूजचा विकासाचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार या व्यापाऱ्यांच्या बैठकीतून स्पष्टपणे दिसून आला. यावेळी नागरिकांनी कचऱ्यांची समस्या मांडली भाजी मंडई व शिवापूर पेठेत रस्त्यावर कचरा टाकतात हे अशोभनीय आहे. नगर परिषदेने आरोग्य यंत्रणेने यावर तत्परतेने कारवाई करणे गरजेचे आहे.याचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे रस्ता रुंदीकरणाचा पण विषय मांडताना व्यापाऱ्यांनी रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी केली. बाधित जागेचा मोबदला म्हणून नगरपरिषद रक्कम देणार का असाही प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. पेठेतून गेलेला पाण्याची लोखंडी पाईप लाईन वरून गाड्या घसरतात व वयोवृद्ध माणसे पाय घसरून पडतात त्याचाही बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली. शिवापूर पेठेत येणाऱ्या रोडवरती अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा परिणाम गिर्‍हाईकावर होत आहे. वाहतूक कोंडी व अपुरे रस्ते यामुळे पेठेतील व्यापाऱ्यावरती बिकट परिस्थितीत निर्माण झाल्याचे व्यापारी वर्गाने निदर्शनास आणून दिले. यावर लवकरच अभ्यास करून तोडगा काढण्याचा सूचना सयाजीराजे मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या दिल्या. या बैठकीस नगर परिषदेचे अधिकारी व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button