solapur

निंबाळकरांचे बँनर फाडल्याने अकलूज मध्ये तणाव

निंबाळकरांचे बॅनर फाडल्याने अकलूजमध्ये तणाव

संचार वृत्त अपडेट

माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये लावलेले डिजिटल फलक फाडल्याप्रकरणी मारकडवाडी येथील संजय भाळे विरुब्द येथील पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी त्यास त्याच्या चार चाकी वाहनासह ताब्यात येतले आहे. याप्रकरणामुळे काहीकाळ वातावरण तणावग्रस्त बनले होते.

अकलूजमध्ये अलीकडे डिजिटल फलकांचा सुळसुळाट वाढला आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केल्याचे तसेच माणचे आमदार जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारे असे अनेक मोक्याच्या ठिकाणी व चौका चौकात भाजपच्या वतीने फलक लावले आहेत. विशेष म्हणजे अकलूज शहरात प्रथमच मोहिते पाटील यांच्याशिवाय विरोधकांचे अनेक फलक लागले आहेत. मध्यंतरी तेही फलक फाडल्याच्या घटना घडल्या.

१९ फेब्रुवारी रोजी माजी खा. रणजितसिंह निंबाळकर यांचा वाढदिवस असल्याने शहर भाजपच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. असाच फलक मसूद मळा कर्मवीर चौकात लावलेला आहे. गुरुवारी दुपारी मारकडवाडी येथील संजय भाळे हे त्यांच्या बलोरो या गाडीतून जात असताना त्यांनी हा फलक पाहिला, व गाडीतून उतरून हा फलक फाडल्याने तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना गाडीसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसानी त्याच्याविरुध्द अदखल पात्र गुन्हा नोंद करून पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button