प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुरस्कार जाहीर–सोमनाथ खंडागळे व शशिकांत कडबाने यांची माहिती
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुरस्कार जाहीर--सोमनाथ खंडागळे व शशिकांत कडबाने यांची माहिती
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुरस्कार जाहीर
अकलूज (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी लेखक व कवी डॉ प्रदीप आवटे , माउंट मकालु सर केलेले सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, पर्यावरण संरक्षक वीरबहादुरसिंह मगर, राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविलेला पृथ्वीराज घाडगे हे आहेत. तर ज्ञानदानाचे कार्य करणारे डॉ. सचिन अहिरे व क्रीडा शिक्षक विजय पवार यांनाही विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोलापूर जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरविण्यात करीत असते यंदाचे चौथी वर्ष असून यावर्षीचे पुरस्कार लवकरच समारंभ पूर्वक प्राण करण्यात येणार आहे असल्याची माहिती अध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ निर्मूलन तसेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सेवेतील राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ प्रदीप आवटे यांनी एमबीबीएस डीसीएच या वैद्यकीय पदवींबरोबरच इंग्रजी साहित्यात एम ए व सुवर्णपदकासह
पत्रकारितेतील पदवी प्राप्त केली असून त्यांच्या कविता कथांचा अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अशा सिद्ध हस्त व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यात येणार आहे
नागपुरशहर पोलीसांत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी जगातील पचाव्या उंच ठिकाणी माउंट मकालु येथे भारताचा तिरंगा फडकवला.शिवाजी ननवरे यांना 2018 साली पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केला आहे2019सालीकेंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या जिद्दी व यशस्वी गिर्यारोहकाचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.माळशिरस तालुक्यातील ओसार माळरानावर सुमारे 2000 झाडे लावून त्याचे संगोपन व संवर्धन करीत वनराई फुलविणारे वीरबहादुरसिंह मगर तर धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण- २५ रौप्य १८ कास्य-१९ अशी ६२ पदके व ट्राफी-४५ मिळवलेल्या युवा खेळाडू पृथ्वीराज घाडगे यांचाही संघाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे सोमनाथ खंडागळे यांनी सांगितले.