entertainment
गेले ते ग्रामपंचायतीचे सुवर्ण दिवस…राहिल्या फक्त इमारतीवरील नावातच आठवणी…!
गेले ते ग्रामपंचायतीचे सुवर्ण दिवस...राहिल्या फक्त इमारतीवरील नावातच आठवणी...!
गेले ते ग्रामपंचायतीचे सुवर्ण दिवस…
राहिल्या फक्त इमारतीवरील नावातच आठवणी…!
संचार वृत्त प्रतिनिधी
अकलूज — आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर अकलूज नगरपरिषदेत होऊन दोन तीन वर्षे लोटून गेली पण अकलूजमधील अजून काही काही इमारती आज ही अकलूज ग्रामपंचायतीचे अस्तित्व व आठवण करून देत आहेत. शिवापूर पेठेतील अकलूज ग्रामपंचायतीची सदुभाऊ सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीवरील नामफलकामध्ये आज हि अकलूज ग्रामपंचायतीचे नाव झळकत आहे.त्यामुळे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी म्हणायची वेळ अकलूजकरांवर आली आहे.