सामाजिक राजकीय जीवनात कार्यरत असताना सभ्यता काय असते हे अकलूजचे मोहिते पाटील यांच्याकडून शिकावे
सामाजिक राजकीय जिवनात कार्यरत असताना सभ्यता काय असते हे अकलूज चे मोहिते पाटील यांचेकडून शिकावे
बी .टी. शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
————————————————–
श्रीपुर (प्रतिनिधी)हल्ली सामाजिक राजकीय वातावरण कमालीचे गढुळ व दुषित झाले आहे त्यामुळे या गदारोळात कोण उजवा कोण डावा हे ओळखणे म्हणजे दलदलीच्या चिखलात बैठक मारुन स्वच्छ निघणे अशक्यप्राय आहे तद्वत राजकीय वातावरण आपल्या बोलघेवडे व मर्यादा सोडून हिन पातळी गाठलेल्या राजकारणी नेत्यांनी सर्व मर्यादा साधनशुचिता गुंडाळून ठेवली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची स्पर्धा वाढली आहे राजकारणात काय नियम पात्रता अटी बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अपेक्षित असते पण हल्ली माध्यमांवर बोलताना सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रवक्ते कार्यकर्ते यांची भुमिका आक्रस्ताळेपणा मग्रुरी ची भाषा धमकी ऐकली की भल्या भल्यांना हे राजकारण हे नेते कार्यकर्ते कुठे घेऊन चालले आहेत याची खरे तर शिसारी यावी अशी स्थिती परिस्थिती आहे ज्यांच्याकडे सभ्यता सुसंस्कृत विचार व महाराष्ट्र हिताची विकासात्मक प्रशासनाची जबाबदारी व काम करुन घेण्याची अपेक्षा असते मात्र सत्ताधारी नेते अधिकारी हाताशी धरून गलिच्छ राजकारण करतांना पहायला मिळतात हे दुर्दैव आहे ही एकंदरीत सध्याची राजकीय सामाजिक अस्थिर परिस्थिती पाहिली तर अकलूजचे मोहिते पाटील घराणे यांनी साठ सत्तर वर्षे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जिवनात नेतृत्व केले आहे यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते विजयसिंह मोहिते विजयसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील व आता नुतन खासदार धैर्यशील मोहिते तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मोहिते पाटील घराण्यातील ज्येष्ठ व युवा नेतृत्वाने आपली सामाजिक राजकीय कारकीर्द व वाटचालीत कुठेही बोलण्याची वागण्याची सभ्यता मर्यादा याचा तोल ढळू दिला नाही राजकारण समाजकारण जरुर केले विरोधात भूमिका घेतली पण सध्याच्या राजकारणात जी भाषा वापरली जाते ती चुक यांनी केली नाही त्यामुळे त्यांनी आपली वैचारिक भुमिका मांडताना राजकारण करताना कार्यकर्ते घडवले सत्तेत बसवले पण फितुरी गद्दाराच्या मालिकेत कधी नाव येऊ दिलं नाही हे मोहिते पाटील यांच्या सुसंस्कृत सभ्य राजकारणाचे वैशिष्ट्य आहे जयसिंह ऊर्फ बाळदादा मोहिते पाटील हे समाजकारण राजकारण यातील मास्टरमाईंड म्हणून ओळखले जातात त्यांची कामाची पध्दत काटेकोर शिस्तबद्ध आहे जे बोलणारं ते करून दाखवणार जे करायचे नाही ते बोलणारच नाहीत त्यांच्या कामाची खासियत अशी आहे की सावज टप्प्यात आले की शिकार करणारच त्यांचे अचुक निरिक्षण परफेक्ट नियोजन यामुळे हाती घ्याल ते तडीस न्याल ही त्यांच्या कामाची पद्धत राहिली आहे कार्यकर्ते नेते यांनी ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडलीच पाहिजे हा त्यांचा कटाक्ष आहे निव्वळ भाषणबाजी पोकळ इशारे बिनकामाची गर्दी हे त्यांना बिलकुल पसंत नाही कोणत्या भागात गावात खेड्यात वस्त्या वाड्यावर आपलं पक्कं मतदान किती आहे यावर ते उभा केलेला उमेदवार किती मताधिक्याने निवडून येईल हे अचुक ते सांगू शकतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अचानक राजकीय निर्णय घेऊन भाजप बरोबर जायचे नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या बरोबर जायचे व माढा लोकसभा मतदारसंघात आपला कार्यकर्ता निवडून आणायचाच ही खूणगाठ बांधून त्यांनी तशी यंत्रणा राबविली विशेष म्हणजे त्यांनी माध्यमातून स्पष्ट सांगितले होते की माढा सोलापूर बारामती व सातारा या चार लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी मी जोरदार प्रयत्न करणार त्यावेळी ही बाब अनेक जाणकारांना हास्यास्पद वाटली होती कारण नरेंद्र मोदी यांनी चारशे पार चा नारा देऊन देशात खळबळ उडवून दिली होती पण बाळ दादांनी बोलल्या प्रमाणे माढा सोलापूर बारामती या तीन जागा जिंकून आपला शब्द खरा करून दाखवला सातारा ही जागा निवडणुक चिन्ह साधर्म्य असल्याने ती जागा कमी फरकाने गेली बाळदादा म्हणजे वेळेचे शिस्तीचे व दिलेल्या शब्दाला पक्के रहाणारे हे सोलापूर जिल्ह्यात समिकरण झाले आहे ते उत्तम कलाकार खेळाडू संघटक सुसंस्कृत नागरिक आदर्श राजकारणी शिक्षणतज्ज्ञ कलावंतांचे तारणहार गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे सहकार नेते अशी त्यांची महती योग्यता पात्रता ओळख असलेले उत्तम सहकारी म्हणून त्यांनी निर्माण केली आहे राजकारणात सर्वच पातळ्यांवर आपली आदर्श प्रणाली त्यांनी वापरली आहे