solapur

स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.रेवती राणे

स्त्रीच्या आरोग्यसाठी सतत प्रयत्नशील रहाणार. डाॅ.रेवती राणे

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (केदार लोहोकरे)
“महिला स्वास्थ्यम् सर्वसुखानाम्” हे धोरण असलेली असलेल्या अकलूज स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.रेवती राणे (इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला शाखा माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग तज्ञ जनजागृती समितीच्या अध्यक्षा) यांची तर उपाध्यक्ष डॉ. विनोदकुमार शेटे (अकलूज), सचिव डॉ.कविता कांबळे (करमाळा),सहसचिव डॉ.अमित चोपडे (टेंभुर्णी),कोषाध्यक्ष डॉ. विशाल शेटे (करमाळा) यांची निवड करण्यात आली आहे.तर कार्यकारी सदस्यांमध्ये डॉ.सचिन गवळी (अकलूज),डॉ.मदन कांबळे (टेंभुर्णी),डॉ.दिग्विजय राऊत (अकलूज),डॉ.अमोल फडे (अकलूज),डॉ.उत्कर्ष गांधी (नातेपुते),डॉ.जागृती मगर (अकलूज) डॉ.गायत्री एकतपुरे (माळीनगर) यांचा समावेश आहे.


अकलूज स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेची कार्यकारिणीची धुरा दि.१ एप्रिल २०२५ पासून नवीन समितीने पदभार स्वीकारला आहे.अकलूज येथे स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेची स्थापना ५ डिसेंबर २०१३ रोजी करण्यात आली. डॉ.वंदना गांधी या संघटनेच्या त्या संस्थापिका आहेत तर सिनियर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सतीश दोशी,डॉ.सविता गुजर,डॉ.भारत पवार,डॉ.विनोद शेटे,डॉ.मदन कांबळे,डॉ.प्रिया कदम यांनी यापूर्वी याचे अध्यक्षपद भूषवले आहे.हि संघटना १२ वर्षापासून सक्रियपणे कार्यरत असून माळशिरस,माढा,इंदापूर, करमाळा या तालुक्यामधील ४० स्त्रीरोग तज्ज्ञ सदस्य आहेत.


या संघटनेच्या औपचारिक पदग्रहण सोहळा २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.किरण कुर्तकोटी यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.यामध्ये पुरुष वंध्यत्वावर परिषद व कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पुढील वर्षभर कार्यक्रमामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी अत्याधुनिक व मार्गदर्शनपर परिषदांचे नित्यनियमाने आयोजन करण्यात येईल पण त्याच बरोबर जनजागृती कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे.त्यामध्ये सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे गर्भवती मातांसाठी १५ एप्रिल रोजी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर स्तनांच्या कर्करोगांसाठी मिशन पिंक पामस,पिशवीच्या कर्क रोगासाठी सुरक्षा कवच कॅम्पेन,आरोग्य दिंडी,स्तनपानाचे महत्व सांगणारे रिश्ता रेशीमगाठी इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.या कार्यक्रमा अंतर्गत सर्व स्त्रीवर्ग,नर्सिंग स्टाफ,आशा सेविका अशा सर्वांना मार्गदर्शन केले जाणार आहे व स्त्रीहित व स्त्री आरोग्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन असे नूतन अध्यक्षा डॉ.रेवती राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button