किशोरसिंह माने पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

किशोरसिंह माने पाटील यांचा ६७ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज गावाचे लोकप्रिय व्यक्तीमत्व तथा अकलूज ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच सरपंच किशोरसिंह माने पाटील यांचा ६७ वा वाढदिवस पाटील वाड्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून अकलूजकरांनी व मित्र मंडळ परिवारांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
अकलूज गावातील गोरगरिबांचे कैवारी व युवकांचे मार्गदर्शक व आशास्थान असलेले किशोरसिंह माने पाटील यांना आज सकाळी घरातील सुहासिनी महिलांनी औक्षण केल्यानंतर अकलूज गावची ग्रामदैवत श्री अकलाई देवीचे दर्शन घेतले व नीरा नदीच्या काठावरील कर्मवीर कै. बाबासाहेब माने पाटील यांचा समाधीचे दर्शन घेतले.त्यानंतर अकलूजमधील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले.पाटील वाड्यात आल्या नंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेते, पदाधिकारी,अकलूज शहरातील व्यापारी, विविध संघटनेचे प्रतिनिधी,विविध समाजाचे सदस्य,पोलीस दलातील अधिकारी,अकलूज ग्रामपंचायतीचे माजी कर्मचारी, युवक कार्यकर्ते,विविध सामाजिक मंडळाचे कार्यकर्ते, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व नवरात्र मंडळाचे,मराठा सेवा संघाचे पदाधिकारी,विविध दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार,पोर्टलचे प्रतिनिधी,विविध यु ट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी,अकलूजमधील विविध बॅंकेचे अधिकारी यांनी येवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
किशोरसिंह माने पाटील अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीने उत्कृष्ट ग्रामस्वच्छता अभियान राबवून महाराष्ट्र शासनाचे आठरा लाखाचे बक्षीस मिळवले होते.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते बक्षीस मिळवले होते.अकलूज येथील ग्रामीण रूग्णालयात परिसरात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा व व्यवसाय करण्यासाठी शाॅपिंग सेंटर उभारले आहे.विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुलसाठी जागा त्यांच्या कार्य काळात मिळाली आहे.
शाॅपिंग सेंटरवरील दुस-या मजल्याचे दुकान गाळे बांधले आहेत.सदुभाऊ सार्वजनिक वाचनालयाची भव्य इमारत ही त्यांच्या कारकिर्दीत झाली असून अकलूजचा सर्वांगीण विकास करत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ केली होती.
माळशिरस तालुक्यात लवकरात लवकर एमआयडीसी सुरू व्हावी. युवकांच्या हाताला काम मिळावे व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा.त्याच बरोबर अकलूजच्या नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.अकलूज नगरपरिषदेच्या जाचक अटी व विविध प्रकारचे वाढवलेले कर व त्या करावर आकारले जाणारे व्याज हे अकलूजकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.त्यावर माळशिरस तालुक्यातील विद्यमान आमदार यांनी विधानसभेत आवाज उठवावा अशी अपेक्षा किशोरसिंह माने पाटील यांनी व्यक्त केली.