रवींद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

रवींद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
संचार वृत्त अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ विद्यालय बोरगाव येथे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. श्रीनाथ विद्यालय यास सोपासेट व एक खोली फरशी बसवणे व जिलेबी वाटप करून सामाजिकप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यात आल. यावेळी मा. रवींद्रभाऊ पाटील यांचा सत्कार प्राचार्य रेपाळे सर यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमासाठी बोरगाव गावचे पोलीस पाटील मा.वीरेंद्र पाटील ,डी.सी.सी बँकेचे मा.दत्तात्रय पाटील मा. आनंद पाटील मा. रणवीर पाटील सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव प्रा. नरेंद्र भोसले मा. धीरज म्हसवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष शिवम काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. मा.रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ,माझी दोन्ही मुले यांनी सांगितले की ,तुमच्या वाढदिवसानिमित्त सामाजिकरूपात साजरा करू म्हणून आज हा माझा वाढदिवस साजरा केला आणि शाळेसाठी एक वर्ग खोलीसाठी फरशी बसवणे व ऑफिस साठी सोपा सेट व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप असा साजरा केला त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. प्रा.नरेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले की, डिजीटल बोर्ड न लावता ,कोणताही इतर खर्च न करता सामाजिक उपक्रम करून खरा अर्थांनी वाढदिवस साजरा केला बद्दल आभार मानले, कार्यक्रांचे सुत्रसंचलन सौ.पाटील मॅडम यांनी केले