स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना दिलासा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना दिलासा
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पशुसंवर्धन बाधित झाली होती लसीकरण वेळेत न झाल्याने शेतकऱ्यातून संतापाची लाट उसळली होती यासाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्याशी संपर्क करून पशुसंवर्धनास लसीकरणाची तात्काळ गरज असल्याचे
सांगितले शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीतील संबंधित विभागात जाऊन प्रशासनास लसीकरण बाबत जाब विचारला असता तात्काळ सहाय्यक आयुक्त व पशुसंवर्धन अधिकारी यांनी डॉक्टरांना सूचना करून पिसेवाडी,विजोरी यासह अन्य गावात जाऊन उपचार चालू केल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून स्वाभिमानी संघटनेच्या पुढाकारानेच प्रश्न मार्गी लागला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले