श्रीपूर मधील जिल्हा परिषद शाळेतील आपल्या लाडक्या शिक्षकांच्या बदल्या झाल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

श्रीपूर मधील जिल्हा परिषद शाळेतील आपल्या लाडक्या शिक्षकांच्या बदल्या झाल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर
संचार वृत्त अपडेट
श्रीपूर : आपण ज्या शाळेत रोज आपल्या आवडत्या व लाडक्या गुरुजनांना भेटत होतो त्यांचा सहवास लाभला ते आपल्या आई वडिलां प्रमाणे आपल्यावर प्रेम करत होते अशा लाडक्या शिक्षकांची येथून बदली झाल्याचे समजताच शाळेतील विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले काही विद्यार्थिनी यांनी आपल्या शिक्षकांना मिठी मारून धाय मोकलून रडायला सुरू केले जिल्हा परिषद शाळा श्रीपूर येथे गेली सात वर्षे येथे मुख्याध्यापक पोळ सर व सौ आशा हेळकर हे दोन विद्यार्थी प्रिय शिक्षक कार्यरत आहेत मात्र प्रशासकीय नियमानुसार या दोन शिक्षकांना बदलीचे पत्र आज प्राप्त झाले आणि विद्यार्थ्यांत एकच खळबळ उडाली आपले शिक्षक आपणांस सोडून अन्य शाळेत जात आहेत हे त्यांना सहन झाले नाही मुख्याध्यापक पोळ सर यांची बदली चोरमले वस्ती व सौ आशा हेळकर यांची बदली मिरे येथील जिल्हा परिषद शाळेत झाली आहे सौ आशा हेळकर या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या मातोश्री आहेत