
कार्यकर्त्या प्रति असणारी जबाबदारी नेत्यांनी सांभाळली पाहिजे साजिद भाई एक निष्ठ कार्यकर्ता ; उत्तम जानकर
संचार वृत्त अपडेट
आपला नेता आमदार व्हावा हे ध्येय उराशी बाळगून सन 2009 पासून म्हणजेच मागील तब्बल सोळा वर्षापासून मांसाहार न करता आजतागायत गेली १६ वर्षे झाली ज्यांनी मांसाहार केला नाही असा विद्यमान आमदार -उत्तमराव जानकर यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणजेच साजिदभाई सय्यद होय.
आपला नेता आमदार व्हावा हे स्वप्न साकार करण्याची त्यांची इच्छा होती ती 2024 मध्ये पूर्ण झाली आणि सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर हे माळशिरस तालुक्याचे आमदार झाले त्या अनुषंगाने दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी साजिद भाई सय्यद यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात आमदार उत्तमराव जानकर यांनी उपस्थिती लावून त्यांनी स्वतः आपल्या हाताने एकनिष्ठ कार्यकर्ता साजिदभाई सय्यद यांना मांसाहाराचा घास भरवला आणि मनापासून आभार मानले
याप्रसंगी बोलताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की कार्यकर्त्यांनी नेत्यावर किती प्रेम करावे हे साजिद भाई कडून शिकावे परंतु साजिद भाई यांना इतका आत्मविश्वास होता की मी एक दिवस आमदार होणार हेच एकमेव भीष्म प्रतिज्ञा होती ती आज पूर्ण झाली असे कार्यकर्ते असतील तर आपल्याला आमदार व्हावेचं!.. लागेल ही प्रेरणा मला साजिद भाई कडून मिळाली हेच व्रत अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन जाईल नेत्यांविषयी किती प्रेम असावे आणि नेत्याने सुद्धा कार्यकर्त्या प्रति असणारी जबाबदारी सांभाळली पाहिजे तसेच नेता त्या कुवतीचा आहे का नाही हे पाहणे गरजेचे असते .कार्यकर्त्या मुळेच नेत्यांमध्ये जिद्द निर्माण होईल असे कार्यकर्ते निर्माण झाले हे मी माझे भाग्य समजतो झयाप्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश शेटे ,ऍड. वजीर शेख , ऍड.अविनाश काले, नंदकुमार केंगार ,वैभव शेठ नागणे, अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष- सुरेश गंभीरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य -अशोकराव गायकवाड , पत्रकार –अमीर मोहोळकर नौशाद मुलाणी, हुसेन मुलाणी,पंचायत समिती माजी सदस्य -अजय सकट ,सोमनाथ हुलगे, एजाजखान पठाण, जाकीर खान पठाण ,जुल्करैन शेख ,अब्बास भाई शेख, हमीद मुलाणी संग्राम नगर, संजय पाड़ोळे, राजेश गायकवाड, जावेदभाई बागवान, शुक्र भैय्या(शकुर) माढेकर, काशिम दादाभाई (कासिम )तांबोळी, हमीद भाई मुलाणी -राऊतनगर ,तानाजी शिंदे ,संजय कोळेकर, सलीम तांबोळी, संजय दळवी ,अमोल पानासे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.