भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास काटगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवणार—युसुफ मुलाणी

भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास काटगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवणार—युसुफ मुलाणी
काटगाव जिल्हा परिषद मतदार संघात युसुफ मुलाणी यांच्या नावाच्या चर्चेला उधान
संचार वृत्त अपडेट
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून नुकत्याच जाहिर झालेल्या आरक्षणाने आत्तापासूनच मोर्चे बांधणीसही सुरवात झाली आहे याच अनुषंगाने तुळजापुर तालुक्यातील काडगाव जिल्हा परिषद हा मतदार संघ ओबीसी पुरुषासाठी आरक्षित असून भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास पुर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे खंदे समर्थक युसुफ मुलानी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले
युसुफ मुलानी हे 1990पासून भारतीय जनता पक्षासोबत आहेत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून गोरगरीब, दीनदलीत,अल्पसंख्याक समाजातील रंजल्या गांजल्याना अनेक वेळा मदत केली आहे
विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वात ते सातत्याने गोरगरीब, दीनदुबळ्या, अल्पसंख्याक समाजातील रंजल्या गांजल्याना त्यांनी वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे तसेच गाव परिसरात अनेक लोकोपयोगी योजना आणून गाव परिसराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात गेल्या वेळी त्यांनी काडगाव पंचायत समिती निवडणुक लढवली होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता पराभवाने खचून न जाता उलट त्यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले व भविष्यातही राबवणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
निर्व्यसनी, सुसंस्कृत, जमेचे राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ते जनतेची प्रामाणिक सेवा करतात यामुळेच होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परीषद निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची काडगाव जिल्हा परिषद मतदार संघातून चर्चा केली जात असून आजपर्यंतच्या सामाजिक कामाची दखल या निवडणुकीत जनता घेईल जनतेच्या आशीर्वादाने काडगाव जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट करून जिल्ह्यात आदर्श मतदार संघ निर्माण करीन असेही त्यांनी स्पष्ट केले निश्चितच एका शिक्षित व लढवय्या कार्यकर्त्यास भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होईल अशी चर्चाही गाव परिसरातून ऐकावयास मिळत आहे



