माळीनगर कारखान्याचा 161/- रु.हप्ता वर्ग एकूण दर 2911/-रु. कर्मचाऱ्यांसाठी 15 टक्के बोनस

माळीनगर कारखान्याचा 161/- रु.हप्ता वर्ग एकूण दर 2911/-रु. कर्मचाऱ्यांसाठी 15 टक्के बोनस
संचार वृत्त अपडेट
दि सासवड माळी कारखान्याने ऊस उत्पादक केंद्रबिंदू मानून चांगला दर देण्याचे परंपरा राखली आहे 2024-25 या सीजनला पहिला हप्ता 2750/रु.तर दीपावली सणासाठी 161/रु. असे एकूण 2911/- रु. दिले व कर्मचारी वर्गासाठी पंधरा टक्के बोनस दिला आहे. त्यांनी ऊस उत्पादकाला दिलेला शब्द कारखाना प्रशासनाने पाळला आहे. त्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनाचे अभिनंदन केले. कारखाना ऊस उत्पादकांना वेळोवेळी ऍडव्हान्स देत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना वेळी अवेळी आर्थिक मोलाची मदत मिळत असते.
ऊस उत्पादक व कर्मचारी हेच आमचे भांडवल
सध्या माळशिरस तालुक्यात कोणत्या साखर कारखान्याचा उच्चांकी ऊस दर आहे याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याचे पाठोपाठ दि सासवड माळी शुगर फॅक्टरी ने चांगला दर दिल्याने शेतकरी सभासद वर्गातून समाधान व्यक्त होत आहे सहकारी साखर कारखाने राज्य सरकार व केंद्र शासनाच्या मेहरबानी वर चालवले जातात त्यामुळे ते कारखाने सभासद शेतकऱ्यांना कमी जादा दर देऊन आशेवर ठेवत असतात शंभर कोटी दोनशे कोटी असे भरभक्कम अनुदान सवलतीच्या रुपात सहकारी साखर कारखान्याचे राजकारण समाजकारण सुरू असते पण विशेष नमूद करावी व दखल घ्यावी असे देशातील दुर्मिळ व एकमेव उदाहरण म्हणजे दि सासवड माळी शुगर फॅक्टरी हा खाजगी साखर कारखाना शतकोत्तर वाटचालीच्या उंबरठ्यावर आहे या कारखान्याला कोणतेही शासकीय अनुदान सवलत नाही तरी पण शेतकरी सभासद हेच आमचं मोठ भांडवर आधार मदत समजून सदर कारखाना शुन्यातून उभा राहिला आहे व व वाटचाल करत आहे या कारखान्याचे मॅनेजमेंट सकारात्मक भुमिकेतून सभासद यांच्या विश्वासावर अढळ श्रद्धा व दृढ विश्वास ठेवून कारखाना चालवत असल्याने कारखान्याचे पुढं अनेक आर्थिक तांत्रिक अडचणी समस्या असतानाही केवळ राजकारण विरहित संचालक मंडळ मॅनेजिंग डायरेक्टर यांचे पुर्ण काटकसरीचे धोरण यामुळे कारखाना सुरळीत सुरू आहे त्यामुळे शतकोत्तर वाटचालीच्या उंबरठ्यावर असलेल्या माळीनगर कारखान्याची वाटचाल चालू आहे
राजेंद्र गो. गिरमे (चेअरमन)