solapur

अकलूज-निमगाव रस्ता खड्डेमय ; नागरिक त्रस्त

अकलूज-निमगाव रस्ता खड्डेमय ; नागरिक त्रस्त

संचार वृत्त अपडेट 

अकलूज निमगाव रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेले असून प्रवास चालकाचे दमछाक होत आहे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दुचाकी स्वारांचे अपघात दररोज घडत आहेत नागरिकांतून संताप व्यक्त होत असून आपटून पडण्याच्या घटना तर वारंवार घडत आहेत या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याची तक्रार वाहन चालक करत आहेत वारंवार सांगूनही हालचाल होत नाही अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

दोन दिवसात खड्डे न मुजवल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर यांनी दिला आहे याबाबत बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ए.डी. कडतारे यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, शेतकी अधिकारी राजाराम बोरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button