दि.सासवड माळी कारखान्याने दुसरा हप्ता त्वरित द्यावा ऊस उत्पादकाची मागणी

दि.सासवड माळी कारखान्याने दुसरा हप्ता त्वरित द्यावा ऊस उत्पादकाची मागणी
संचार वृत्त अपडेट
दि सासवड माळी शुगर माळीनगर कारखान्याचा अग्नी प्रदीपन व बॉयलर पूजन कारखान्याचे माजी ज्येष्ठ मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
गत हंगामातील ऊसाला ३०००/- रुपये दर जाहीर करावा
कारखान्यांने बॉयलर अग्नी प्रदीपन होऊन आता कारखान्यांची मोळी पूजनाची तयारी लवकरच सुरू होईल. पण अद्याप पर्यंत हंगाम २०२४/२५ गाळपास आलेल्या उसाचा कारखाना प्रशासनाने दुसरा हप्ता जाहीर केला नाही. अंतिम दर काय असेल यावर जाहीर वाच्यता केलेली नाही. २०२५/२६ गळीत हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे तरीही ऊस दराची अंतिम हप्त्याची कोंडी अद्याप पर्यंत फोडलेली नाही तरी कारखाना प्रशासनाने गत हंगामातील उसाचा मिळालेला दर 2750/- व अधिक 250/ रू. असा एकूण दर ३०००/-जाहीर करून २५०/- रुपये त्वरित ऊस उत्पादकांना द्यावेत अशी मागणी ऊस उत्पादक सभासद समीर पांढरे, हेमंत रासकर यांनी बॉयलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी कारखाना प्रशासनास केली.