ओंकार साखर कारखान्याचा उच्चांकी दर दिवाळीसाठी २०५ रुपये एकूण दर ३००५/-तर फेब्रुवारीतला ३१०५/-दर शेतकरी वर्ग खुश

ओंकार साखर कारखान्याचा उच्चांकी दर दिवाळीसाठी २०५ रुपये एकूण दर ३००५/-तर फेब्रुवारीतला ३१०५/-दर शेतकरी वर्ग खुश
संचार वृत्त अपडेट
निमगाव (म)- प्रतिनिधी (रामचंद्र मगर)
चेअरमन बाबुराव बोञे पाटील
ओंकार साखर कारखाना चांदापुरी ता माळशिरस चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी केंद्र बिंदु मानुन गेल्या सहा वर्षीपासून काम करीत आहेत कारखान्याकङे कोणतेही उप पदार्थ प्रकल्प नसताना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली 202४ व202५ या सिझनला पहिला हाप्ता 2८00रूपये तर दिपावली साठी 20५एकूण ३00५ रूपये दिले तर फेब्रुवारीत गेलेल्या ऊसास 3१0५ दर दिला त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व वाहन धारकांना दिलेला शब्द पाळला किंबहुन त्या पेक्षा दर जास्त दिला या बद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहन धारकांनी बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठान च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाहनधारकांना जे देणे शक्य ते देण्यासाठी ओंकार साखर कारखाना परिवार कटिबद्ध आहे बाबुराव बोञे पाटील यांनी सांगितले.