माजी सैनिक शिवाजी सावंत यांचे आझाद मैदान मुंबई येथे दिनांक एक नोव्हेंबर २०२५ रोजी उपोषण

माजी सैनिक शिवाजी सावंत यांचे आझाद मैदान मुंबई येथे दिनांक एक नोव्हेंबर २०२५ रोजी उपोषण
संचार वृत्त अपडेट
आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी कंपन्याद्वारे होत असलेल्या ग्रामपंचायत कर चूकवेगिरीबाबत वारंवार आवाज उठवत आहेत. प्रशासनाची कर वसुली करणे ही जबाबदारी असतानाही प्रशासकीय अधिकारी काम करण्यास वेळकाढूपणा का करत आहेत असा सवाल श्री सावंत यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना केला आहे. एकाच विषयासाठी मागील अडीच वर्षात तीन गटविकास अधिकारी बदललेले असून कामाची काही प्रगती होत नाही त्यामुळे अधिकारीवर्ग कर चुकवेगिरीस खतपाणी घालत आहेत का किंवा इतर शंका निर्माण होत आहेत त्याची तालुक्यात दबक्या आवाजात चर्चाही सुरू झाली आहे त्यामुळे श्री सावंत यांनी आझाद मैदान मुंबई येथे येथे दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता उपोषण सुरू करणार असल्याचे एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा मुख्यसचिव महारष्ट्र राज्य, मा. आयुक्त छत्रपती संभाजी नगर, जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, तहसीलदार कार्यालय तुळजापूर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना इशारा दिला आहे. हे त्यांचे मागील अडीच वर्षांमध्ये कर वसुली संदर्भातचे आत्मदहन आंदोलनासह सातवे आंदोलन आहे त्यामुळे या आंदोलनाचे तामलवाडी पंचकृषीचे लक्ष वेधून घेतले आहे.